You are currently viewing हॅश टॅग आजी = आई
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

हॅश टॅग आजी = आई

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच समूह सदस्या विख्यात अभिनेत्री सोनल गोडबोले यांचा अप्रतिम लेख

एकत्र कुटुंब पध्दती त्यात कोकणात . घरी गणपती त्याच्या आदल्या दिवशी हरितालिका आणि त्याच्या आदल्या दिवशी तांदुळाच्या भाकरी आणि वालाची उसळ असा सगळा घाट असतो. आजी बाबांची आत्या अशा दोन आज्या सांगायच्या नवरा चांगला मिळायला हवा असेल तर हरितालीकेचा उपवास काहीही न खाता कर आणि व्रत कर. मी दुसरीत होते तेव्हा मला आईने हरितालिकेचे वाण दिले आणि गुरुजीकडुन पुजा करवुन घेतली. हरितालिका दोन दिवसांवर आहे आणि मला हे सगळं आठवतय. तुम्ही म्हणाल असे उपवास करुन नवरा चांगला मिळतो का तर माहीत नाही पण माझ्या भाबड्या आज्जी आणि आईने माझ्या मनात सकारात्मकता तयार केली आणि तसेच विचार करायला शिकवले. परवा माझी मैत्रीण मला म्हणाली सोनल तुला तुझा नवरा बाहेर सोडतोच कसा त्यावेळी मी ते हसुन सोडुन दिलं पण त्या वाक्याचा विचार केल्यावर जाणवलं की माझ्या आजी आईने जे विचार मला दिले तेच मी माझ्या मुलीला द्यायला गेले तर ती म्हणते चिल मार ममा.. काय करावं या पिढीचं ??.. आधुनिकता कि ऱ्हास ??.. एकच नवरा टिकवण्यात आता कोणाला रसच राहिलेला नाही. बदल हवा हे मीही म्हणते पण संसार मोडुन नाही तर टिकवुन. आजच्या आई आजीनेच संस्काराचे वाण मुलीना देणे गरजेचे आहे त्यासाठी आईचा पाय घरी असणे आणि पारांपारिकतेचा आणि आधुनिकतेचा मेळ घालणं गरजेचं आहे. माझ्या नवऱ्याकडे पाहिलं की मात्र नक्की जाणवतं आजी आईची पुण्याई आणि त्यांची विचारसरणी माझ्या वाट्याला नक्कीच आलेय पण माझ्या मुलीच्या बाबतीत मी ही सकारात्मकता नक्की देउ शकते पण ती घ्यायची तयारी या पिढीने दाखवायला हवी ना.. आई वडीलांचे असलेले नाते हाच मुलांसाठी आदर्श असतो . कौन्सिलर वकील यांची पोटं भरत आहेतच सोबत मुलांच्या कोवळ्या मनावर याचा परिणाम होतोय. माझ्या मुलीला वाढदिवसाला तिच्या मित्राने दिलेल्या गिफ्टचा फोटो तिने लगेच शेअर केला पण तिच्या बाबानी तिच्यासाठी घेतलेल्या गिफ्टचा फोटो तिच्याकडुन शेअर झाला नाही . शेवटी काय तुझा बाबा हा तुझा पहिला मित्र बाकीचे सगळे नंतर. हे पटवुन देण्यासाठी मुळात घरात आई वडील आणि मुलान्मधे मैत्री असणं गरजेचं आहे. आईला भाकरी करता आली तरच मुलीला येणारेय .. तेच विचारांचं आणि संस्कारांचं सुध्दा. दोन दिवस मी काही लिहिलं नाही की मला मेसेज येतात. सोनल मॅम लिहा काहीतरी.. माझं लिखाण आवडीने वाचता त्याबद्दल आभारी आहे.

*सोनल गोडबोले*
*लेखिका.. बियॉन्ड सेक्स..* १३००० किलोमीटर

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + eighteen =