You are currently viewing राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतले शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतले शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन

कणकवली

शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या गणपती बाप्पांचे आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दर्शन घेतले. यावेळी संदेश पारकर यांनी शाल व श्रीफळ देऊन अमित सामंत यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढवा याकरता आपल्या गणराया चरणी गाऱ्हाणे देखील घातले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, नगरसेवक कन्हैया पारकर, राष्ट्रवादी कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, निखिल गोवेकर, युवक राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर, आदी उपस्थित होते.

शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या कणकवलीतील निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी यावेळी बाप्पांचे दर्शन घेतल्या नंतर संदेश पारकर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यात राष्ट्रवादी वाटू देत अशा शुभेच्छा देताना पारकर यांनी अमित सामंत यांना मैत्रीची शाल पांघरली.

प्रतिक्रिया व्यक्त करा