You are currently viewing IPS अधिकाऱ्यांनी केला होता सरकार पाडण्याचा प्रयत्न : गृहमंत्री देशमुख यांनी केला गौप्यस्फोट

IPS अधिकाऱ्यांनी केला होता सरकार पाडण्याचा प्रयत्न : गृहमंत्री देशमुख यांनी केला गौप्यस्फोट

मुंबई :

महाविकास सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता, पण तो वेळीच हाणून पाडला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दल गौप्यस्फोट केला आहे.
दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी हा खुलासा केला आहे. काही अधिकारी हे चांगले काम करत आहेत. पण काही पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहे जे राजकीय नेत्यांशी जवळीक साधून आहेत. त्यांची नाव घेता येणार नाही, असं सांगत गृहमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अशी माहिती समोर आली की, चार ते पाच वरिष्ठ अधिकारी आहे. ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने त्यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आणि हे प्रकरण मार्गी लावले.
एवढंच नाहीतर, काँग्रेस नेते शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेतले. त्यानंतर तातडीने पदावरून बाजूला करण्यात आले. त्याच बरोबर चार अधिकाऱ्यांची नावही सांगितली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने पावलं उचलत काही अधिकाऱ्यांना बाजूला सारले. तर काही अधिकारी अजूनही पदावर कायम आहे. अशा अधिकाऱ्यांना तातडीने बाजूला हटवायला पाहिजे होते, अशी मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − three =