You are currently viewing धावती पाऊले ! तुझ्या मंदिरात !!

धावती पाऊले ! तुझ्या मंदिरात !!

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचचे सदस्य दीपक पटेकर यांची अभंग रचना..

धावती पाऊले ! तुझ्या मंदिरात !!
उभा गाभाऱ्यात ! तूचि देवा !!

अखंडित आहे ! धावा हा मनात !!
दिसे तू स्वप्नात ! पाठीराखा !!

नसे भीती मनी ! श्रद्धा तुजवरी !!
भक्ती माझी खरी ! तुझ्या ठाई !!

संकटात सदा ! तूच रे सांगाती !!
तुझे माझे किती ! दृढ नाते !!

साष्टांग नमन ! चरणी तुझिया !!
हृदयी माझिया ! मूर्ती तुझी !!

मागणे आणिक ! नसे तुजपाशी !!
न राही उपाशी ! तुझ्या कृपें !!

(दिपी)✒️
©दीपक पटेकर,सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा