You are currently viewing मुंबई विद्यापिठाच्या उपकेंद्राचे सावंतवाडीत मोठ्या उत्साहात लोकार्पण…

मुंबई विद्यापिठाच्या उपकेंद्राचे सावंतवाडीत मोठ्या उत्साहात लोकार्पण…

निसर्गाला अनुरूप राहून येथिल विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे; राज्यपालांचे आवाहन…

सावंतवाडी

मुंबई विद्यापिठाच्या माध्यमातून सावंतवाडीत सुरू करण्यात आलेल्या उपकेंद्राचे उद्घाटन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते ऑनलाईन पध्दतीने झाले. यावेळी या ठीकाणी चांगला निसर्ग आणि समुद्र आहे. त्याला अनुरूप राहून येथिल विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, आणि मुंबई विद्यापिठाच्या या केंद्राला भविष्यात मोठे स्वरुप प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. कोश्यारी यांनी केले. सावंतवाडी नगरपरिषद आणि अ‍ॅडमिशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथिल बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनीत सुरू करण्यात आलेल्या विद्यापिठाच्या उपकेंद्राचे लोकार्पण आज करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, स्ट्रीमकास्ट कंपनीचे प्रमुख हर्षवर्धन साबळे, मुंबई विद्यापीठाचे बळीराम गायकवाड, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, नागेंद्र परब, नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, अनारोजिन लोबो, दीपाली सावंत, शुभांगी सुकी, दीपाली भालेकर , श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे दिलीप भारमल, मेघा देसाई, रुची राऊत आदी उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थितांना मागदर्शन करताना श्री. कोश्यारी म्हणाले, सिंधुदूर्ग जिल्ह्याला मोठा निसर्ग आणि समुद्र कीनारा लाभला आहे. फक्त या ठीकाणी हिमालय नाही, मात्र त्यावर आपण खंत व्यक्त करीत बसण्यापेक्षा या ठीकाणी असलेल्या निसर्गाशी एकरुप होवून शिक्षण घेेणे गरजेचे आहे. आज उदघाटन होत असलेल्या उपकेंद्राला भविष्यात मोठे स्वरुप प्राप्त व्हावे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. त्यासाठी येथील विद्यार्थ्यानी शिक्षणाची गुणवत्ता कायम उंचावत ठेवणे गरजेचे आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून अनेक कोर्स सुरू करण्याचा मानस असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − four =