You are currently viewing कुडाळ भंगसाळ नदीत मगरीचे दर्शन

कुडाळ भंगसाळ नदीत मगरीचे दर्शन

कुडाळ भंगसाळ नदीत मगरीचे दर्शन

कुडाळ

कुडाळ हायवेलगत असलेल्या भंगसाळ नदीमध्ये आज पुन्हा एकदा मगरीचे दर्शन पहावयास मिळाले . आज भंगसाळ नदीमध्ये चार ते साडेचार फूट लांबीची भली मोठी मगर नदीच्या काठावर पहावयास मिळाली. ही मगर पहाण्यासाठी हायवेने जा- ये करणाऱ्या पादचारी व वाहन चालक आपली वाहने थांबवून मगर पहाण्यासाठी गर्दि केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.याच नदीच्या काठावर असलेल्या वस्तीतील लोकांकडून यापूर्वी ही दोन वेळा दोन ते-तीन मगरीचे एकत्र दर्शन झाल्याचे सांगितले आले.जाणकारांच्या मते मगरी शिकारी साठी किंवा ऊन घेण्यासाठी नदीच्या काठावर येत असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा