You are currently viewing त्या आरोग्य सेविकांनी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांची कणकवलीत घेतली भेट

त्या आरोग्य सेविकांनी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांची कणकवलीत घेतली भेट

पुष्पगुच्छ देऊन मानले आभार

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कमी केलेल्या २० आरोग्य सेविकांना राज्य शासनाने परत सेवेत घेण्यास मान्यता दिली आहे. या आरोग्य सेविका पूर्ववत आहे त्याच पदावर आरोग्य सेवेत रुजू झाल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांची त्या आरोग्य सेविकांनी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आहेत.
यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर,जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर, सचिन सावंत, राजू राणे, हर्षद गावडे,राजू राठोड, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा