You are currently viewing विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांचा जिल्हा दौरा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

                   8 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता कुडाळ जि.सिंधुदुर्ग येथे आगमन व शासकीय विश्रामगृह कुडाळ येथे राखीव व मुक्काम. गुरुवार दिनांक  9 सप्टेंबर 2021 रोजी  सकाळी 10.00 वाजता हॉटेल लेमन ग्रास, कुडाळ, येथे पत्रकार परिषदेस उपस्थित. सकाळी 10.30 वाजता हॉटेल लेमन ग्रास, कुडाळ येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 11.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व विधानपरिषद सदस्य यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून  जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या डेडीकेटेड कोव्हीड-19 हेल्थ केअर सेंटरच्या (डीसीएचसी) ऑनलाईन लोकार्पण कार्यक्रम सोहळयास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथून गोवा विमानतळाकडे  वाहनाने प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा