You are currently viewing कांदळवन आणि जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक संपन्न

कांदळवन आणि जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक संपन्न

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल सोमवारी महाराष्ट्र कांदळवन आणि जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची चौथी बैठक वर्षा निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीत कांदळवन जतन, संवर्धनाबाबत चर्चा करून विविध निर्णयांना मान्यता देण्यात आली. यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, समितीचे सदस्य आमदार वैभव नाईक तसेच विविध विभागाचे मंत्रालयीन सचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आ. वैभव नाईक यांनी कांदळवन क्षेत्र नसलेल्या ठिकाणी सुद्धा कांदळवन वाढत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची शेती नष्ट होत आहे.यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यावर उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. कांदळवन संवर्धनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक वाहन उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले येथे होणाऱ्या फिश हॅचेरीच्या बांधकामाची निविदा लवकरात लवकर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा