You are currently viewing मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा ६६ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा ६६ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त

गेल्या दीड महिन्यात २ लाख १६ हजार कोविड लसीचे डोस प्राप्त

आमदार वैभव नाईक यांची माहिती

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा ६६ हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात करण्यात आला आहे.अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली आहे.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी ज्यादा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आ.वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा ६६ हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात आला असून गेल्या दीड महिन्यात २ लाख १६ हजार कोविड लसीचे डोस जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत. अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा