You are currently viewing कोरोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर रुग्णालयातून मोबाईल गेला चोरीला

कोरोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर रुग्णालयातून मोबाईल गेला चोरीला

पुणे :

पिंपरी – कोरोनाने ग्रासल्याने रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने कोरोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा १२ हजारांचा मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना औंध जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात घडली.
हजरतअली पठाण ( वय ४८, रा. दत्तनगर, वाकड) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पठाण यांचे भाऊ युसूफअली पठाण यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने, वैद्यकीय उपचाराकरिता त्यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान युसूफअली यांचा २७ ऑगस्टला मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर अज्ञाताने त्यांचा मोबाइल चोरल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. हा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी सांगवी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा