You are currently viewing कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

*कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना*

*ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने जल्लोषात देवीचे आगमन*

*आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे केले पूजन व आरती*

सालाबादप्रमाणे कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने आज घटस्थापने दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. देवीसाठी आकर्षक असा दरबार उभारण्यात आला आहे.तर देवीच्या आसनाला आकर्षक अशी फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

आज सकाळी देवीची सवाद्य मिरवणूक कणकवली बाजारपेठेतून नरडवे फाटा नजीक असलेल्या शिवसेना नवरात्रोत्सव स्थळापर्यंत जल्लोषात काढण्यात आली.यावेळी दुर्गामातेचा जयजयकार करत, फटाक्यांची आतषबाजी करून ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत आ. वैभव नाईक,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांसह कणकवली तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या सख्येने सहभागी झाले होते. देवीच्या आगमनाचा उत्साह शिवसैनिकांकडून साजरा करण्यात आला.

आजपासून बुधवार दि २५ ऑक्टोबर पर्यंत देवीची नित्यपूजा,आरती, विविध सांस्कृतिक,धार्मिक,मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी व उपक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, आ. वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक,महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष रामदास विखाळे, खजिनदार प्रदिप मसुरकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये,जेष्ठ शिवसैनिक अनिल हळदिवे,तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,सचिन सावंत,बंडू ठाकूर,सतीश नाईक,राजू राणे, हर्षद गावडे, रूपेश आमडोस्कर, सिद्धेश राणे,महेश कोदे,योगेश मुंज, संतोष परब, तेजस राणे, उत्तम लोके,सचिन आचरेकर, विलास गुडेकर,भालचंद्र दळवी,संतोष पुजारे,धिरज मेस्त्री,नितेश भोगले,सचिन खोचरे,तालुकाप्रमुख वैद्येही गुडेकर, प्रतीक्षा साटम,स्वरूपा विखाळे,दिव्या साळगावकर, अरुण परब,रोहित राणे,संजय पारकर, बाळा आर्डेकर,जयसिंग नाईक, पराग म्हापसेकर,लक्ष्मण हन्नीकोड यांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

संवाद मीडिया*

🦻🦻🦻🦻🦻🦻🦻🦻

🦻 *_बहिरेपणावर कायमस्वरूपी इलाज! कानाची कोणतीही समस्या आता होईल गायब..केवळ ६३०० रुपयांत_*

🦻 *_कानाचे ऑपरेशन अयशस्वी झाले आहे? कानातून आवाज येतो? मशीन लावून पण ऐकायला येत नाही? कानाला होल आहे? कानाचा पडदा फाटलाय? कानातून पाणी, पस बाहेर येतोय? कान सातत्याने ठणकतोय? मोठ्याने बोलले तरी ऐकू येत नाही…_*

🦻 *_या सर्व समस्यांवर रामबाण उपाय, २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या भारत सरकार मान्यताप्राप्त ऋषिकेश आयुर्वेदाचे औषध मागवा..९० दिवसांच्या औषधीसोबत ९० दिवसांचे औषध फ्री..पहिल्या १० दिवसांत ५० टक्के फरक.._*

👉 *_घरपोच औषध मागवण्यासाठी 📲9607305863 या क्रमांकावर नाव गाव पत्ता पिनकोडसह व मोबाईल नंबर व्हॉटस् अप करा.._*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112426/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा