You are currently viewing मळेवाड ग्रामपंचायतच्या वतीने कृषी दिन उत्साहात साजरा…

मळेवाड ग्रामपंचायतच्या वतीने कृषी दिन उत्साहात साजरा…

मळेवाड ग्रामपंचायतच्या वतीने कृषी दिन उत्साहात साजरा…

सावंतवाडी

तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते आज कृषी दिनानिमित्त मळेवाड येथे वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात आज कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते कुलदेवता विद्या मंदिर मळेवाड शाळा नंबर २ च्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी झाडे लावा, झाडे जगवा यानुसार आपण प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. वृक्ष लागवड यामुळे पर्यावरण संतुलन बरोबर जमिनीची होणारी धूप ही थांबते. यामुळे पर्यावरण संतुलित राहते, असे पाटील यांनी सांगितले. तसेच शाळा नंबर २ मधील पहिलीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक रोप तहसीलदार पाटील यांच्याकडून देण्यात आले.

यावेळी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, सानिका शेवडे, मंडल अधिकारी कोदे, तलाठी नागराज,केंद्रप्रमुख म ल देसाई, मुख्याध्यापक लवू सातार्डेकर,बाळू मुळीक,तात्या मुळीक,सामाजिक कार्यकर्ते सगुण जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा