You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सर्जन डॉ.नंदन सामंत यांचे निधन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सर्जन डॉ.नंदन सामंत यांचे निधन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्याधुनिक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सतत प्रयत्नशील असणारे जिल्ह्यातील प्रसिद्ध सर्जन डॉ.नंदन सामंत यांचे अल्पशा आजाराने काल रात्री गोवा येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले..गेले काही दिवस प्रकृती जास्त खालावल्याने ते गोवा येथे वैद्यकीय उपचार घेत होते.
कुडाळ येथे “कर्तव्य साधना” या नावाने सर्वांना परिचित असलेले त्यांचे रुग्णालय जिथे अनेक शस्त्रक्रिया डॉ.सामंत यांनी यशस्वीरीत्या केल्या, त्यामुळे जिल्ह्यात सर्जरीसाठी त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जायचे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी डॉ. सामंतांचे रुग्णालय हे वरदान ठरत होते. कुडाळ येथे गेली जवळपास ३५ ते ४० वर्षे ते रुग्णसेवा देत होते. कुडाळ येथे रेडिओलॉजि सेंटर, एमआयआर मशीन सारख्या सुविधा निर्माण करण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी झटणारे व्यक्तिमत्वाला आज हुकल्याची भावना जिल्हावासीयांची आहे.
डॉ.नंदन सामंत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ.सामंत यांच्या अकाली निधनाने आरोग्य क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सर्वच स्तरावरून त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा