You are currently viewing पाचोळा केलास सारा …

पाचोळा केलास सारा …

जागतिक “सा क व्य” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

येत होती जात होती रोज मी ऐकत होते
आज अचानक काय झाले …
हरवलीत ही माणसे हो कोठे …?

शुभ्र कपडे.. हातगाडी … भरूनी केळी ते येत होते…
लाट आली नि अचानक ….
माणसे ही गेलीत कोठे ….?

लसूण घ्या हो , लसूण घ्या हो..येत नाही हाक आता
काय त्यांनी पाप केले…?
माणसे ही गेलीत कोठे …..?

मीतभाषी साहित्यवेडा मुशाफिर तो एक होता
साहित्य सेवा टाकूनी ही ….
माणसे गेलीत कोठे …..

वैद्य होता.. पत्रकार.. शास्त्रज्ञ होता कोणी थोर
अर्ध्यात ही टाकून सेवा …..
माणसे गेलीत कोठे….

हरी ओंम हरी ओंम गजर मुखाने चाललेला…
रोज आसुसती हे कान ..ऐकू न येते
रामनामाचे हे शब्द …लुप्त झाले सांगा कोठे ..?

हिरे किती नि माणके हो… नाही पहा मोजमिती
डाव टाकून हा अर्धा …
माणसे गेलीत कोठे …

लेकरे भयभित झाली.. अश्रू सारे आटलेले…
जग ज्यांना आकळेना …
कोण सांगा त्यांच्या पाठी ….?

वादळाने उचलून नेल्या …भिरभिर क्षणार्धात गेले
पाचोळा केलास सारा …
असा कसा तू जगजेठी ….

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + ten =