You are currently viewing बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

मुंबई :

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली.

मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे. सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट घेण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सध्या मुंबई पोलिसांची टीम कपूर हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. दिवंगत सिद्धार्थची बहीण आणि मेहुणाही रुग्णालयात पोहोचले आहेत. सिद्धार्थ शुक्लाचे शवविच्छेदन केले जाईल, असे म्हटले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 15 =