You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील रेडी गावासाठी कायमस्वरूपी लाईनमन द्या …

वेंगुर्ले तालुक्यातील रेडी गावासाठी कायमस्वरूपी लाईनमन द्या …

सरपंच रामसिंग राणे यांची महावितरण कडे मागणी

वेंगुर्ला

रेडी गावासाठी असलेले एकमेव लाईनमन गजानन कांबळी हे सेवानिवृत्त होत असल्याने रेडी साठी त्यांच्या जागी दुसरा कायमस्वरूपी लाईनमन मिळावा अशी मागणी रेडी ग्रामपंचायत सरपंच रामसिंग राणे यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता खटावकर यांच्या कडे केली. यावेळी जि.प सदस्य प्रीतेश राऊळ, पं.स.सदस्य मंगेश कामत, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई उपस्थित होते.

गणेशोत्सव जवळ आल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी लाईनमन असणे आवश्यक आहे. कारण काॅन्ट्रक्ट वर असलेले लाईनमन हे सायंकाळी सहा नंतर सेवा देत नसल्याने रात्रीच्या वेळी अडचण निर्माण होते, त्यामुळे कायमस्वरूपी लाईनमन मिळावा अशी मागणी रेडी ग्रामपंचायत सरपंच रामसिंग राणे यांनी केली .

प्रतिक्रिया व्यक्त करा