ठाणे सहआयुक्तांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेध; संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
सावंतवाडी
ठाणे महानगरपालिकेच्या सहआयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज येथील पालिकेतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. दरम्यान हा हल्ला करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष देविदास आडारकर, टी. पी जाधव, आसावरी शिरोडकर, शिवप्रसाद कुडपकर, संतोष भिसे, प्रिया परब, दिनेश भोसले, सुनील कुडतरकर, परवीन शेख, मनोज शिरोडकर आदींसह इतर पालिका पदाधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.
सौ. पिंपळे या फेरीवाल्या व्यापाऱ्यांवर कारवाई करत असताना त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांनी चाकूचा वार आपल्या हातावर झेलल्या मुळे बोटांना गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांना सुरक्षा देणाऱ्या त्यांच्या अंगरक्षकावर सुद्धा त्याने हल्ला. दरम्यान या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सावंतवाडी पालिकेतील पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवत आंदोलन केले.