You are currently viewing दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वार्षिक पुरस्कार वितरण

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वार्षिक पुरस्कार वितरण

*दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वार्षिक पुरस्कार वितरण*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे संगीत, नाटक, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना शानदार आणि हृद्य सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रासह गोवा राज्यातीलदेखील कला आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार – श्री. कृ. जोशी (अच्युत जोशी), संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत – डॉ. विजया टिळक, उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक – अतुल पेठे, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री – निवेदिता जोशी-सराफ, उत्कृष्ट समीक्षक – राजीव जोशी, उत्कृष्ट आईच्या भूमिकेसाठी – मधुराणी प्रभुलकर, संगीत नाट्य क्षेत्रातील उत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेत्री – प्राची जठार, संगीत विशारद परिक्षेत दादर व माहीम विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त – अमृता गोगटे हे या पुरस्कारांचे मानकरी होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा