You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व व्यवसाय सरसकट बंद नकोत – पर्यटन व्यवसाय महासंघ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व व्यवसाय सरसकट बंद नकोत – पर्यटन व्यवसाय महासंघ

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय सरसकट बंद न ठेवता निर्बंध घालून चालू ठेवण्यात यावेत, तसेच व्यावसायिकांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसाय महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान चुकीच्या पद्धतीने मालवण येथील आधार कार्ड बनवणाऱ्या नेपाळी नागरिकाची चौकशी व्हावी, तसेच अन्नसुरक्षा परवाना प्रक्रियेत जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला सहकार्य करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे. याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश आहेत. दरम्यान त्यामुळे व्यवसायिकांची उपासमार होत आहे. या सगळ्याचा विचार करून हे व्यवसाय सरसकट बंद न ठेवता त्यासाठी निर्बंध घालून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे सांगितले. तर एका नेपाळी कामगाराने मालवण येथील रहिवासी असलेले आपले बनावट आधारकार्ड बनविले आहे. त्याची चौकशी करून ते बनवून देणाऱ्यावर सुद्धा कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान अन्नसुरक्षा परवाना प्रक्रियेत जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, उपाध्यक्ष ध्रुव सावंत, सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोलकर, सचिव नकुल पार्सेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 10 =