वेंगुर्ले नगर परिषदेने नुकतेच नवीन गाळे विक्रीसाठी लिलाव पद्धत जाहीर केली. त्यावेळी मनसेने सर्वप्रथम त्या गोष्टीला विरोध केला होता. नंतर मुदतवाढ, प्रक्रियेला स्थगिती. असे विषय घडत गेले. त्याच अनुषंगाने काल रोजी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी वेंगुर्ले व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष, पदाधिकारी, व्यापारी व नागरिक यांची भेट घेतली. यावेळी विवेक खानोलकर व्यापारी संघटना अध्यक्ष, राजेश शिरसाठ जिल्हा व्यापारी संघटना सदस्य, संजय तानावडे, लक्ष्मण दिपनाईक ,अॅड. मनिष सातार्डेकर, नागेश गावडे, सिद्धांत बांदेकर, निलेश वाळके उपस्थित होते.
व्यापारी संघटनेने या सर्व प्रकाराला विरोध केला आहे. मनसे व्यापारी संघटना व व्यापारी गाळेधारक यांच्या पुढील सर्व आंदोलनांमध्ये सहभागी होणार आहे. या भेटीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
हायकोर्टाच्या निर्णयाचा प्रशासन विपर्यास करत आहे. जुने स्थानिक गाळेधारकांना नवीन इमारत बांधताना नवीन इमारतीमध्ये स्थान देऊन अशी आश्वासने प्रशासनाने दिली होती आणि आता प्रशासन हात वर करत आहे. त्यामुळे जुन्या व्यावसायिकांवर उपासमारी आली आहे. त्यांची परिस्थिती बेताची बनली आहे. परप्रांतीयांशी हातमिळवणी करून स्थानिकांना फसवण्याचा मनसुबा प्रशासनाचा आहे .परंतु त्यामध्ये मनसे सफलता येऊ देणार नाही.धनदांडग्या प्रशासनातील काही लबाड लांडग्यांनी 4/4, 5/5 दुकान गाळे घेण्याची तयारी केल्याचे समजते. परंतु जुन्या स्थानिक गरीब दुकान गाळेधारकांचे शाप तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही एवढं त्यांनी लक्षात ठेवावे.
दुकान गाळे स्थानिकांनी व्यतिरिक्त कोणी घेतले तर जुन्या गाळेधारकांना समवेत न्यायालयात दाद मागितली जाईल. यामध्ये कोणाचे आर्थिक नुकसान झाले तर मात्र सर्वस्वी ते स्वतः जबाबदार राहतील. परप्रांतीयांनी त्या गाळ्यामध्ये व्यवसाय करण्यास त्यांना विरोध केला जाईल.. भविष्यात गाळेधारकांना समवेत आंदोलन तीव्र व उग्र केले जाईल. नगर विकास विभागाने या सर्व प्रकरणी स्थगिती द्यावी, या सर्व गोष्टींची दखल घ्यावी, स्थानिकांवर अन्याय होऊ देऊ नये. वेगुर्लेतील सर्व व्यापार्यानी या आंदोलनात सहभागी व्हावे. परप्रांतीय शहरात येणे ही धोक्याची घंटा आहे. याचा गांभिर्याने विचार करावा. असे देथील धीरज परब यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले..