You are currently viewing क्रिकेटचे द्रोणाचार्य काळाच्या पडद्याआड, वासू परांजपे यांचे निधन

क्रिकेटचे द्रोणाचार्य काळाच्या पडद्याआड, वासू परांजपे यांचे निधन

क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून नावाजलेले प्रशिक्षक वासू परांजपे यांचे निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. फलंदाज असो वा गोलंदाज, प्रत्येक खेळाडूचा स्वतंत्र अभ्यास करणारे, त्यानुसार त्याला प्रशिक्षण देणारा व्यक्ती म्हणून वासू परांजपे यांची ओळख होती. बडोदा आणि मुंबईसाठी त्यांनी २९ प्रथम श्रेणी सामने खेळले होते.

क्रिकेटमधील निवृत्तीनंतर परांजपे प्रशिक्षणाकडे वळले. गुणवत्तेची योग्य पारख करणारा अवलिया म्हणून त्यांना ओळखले जात होते. एकदा त्यांनी १४ वर्षीय सचिन तेंडुलकरची मुश्ताक अली यांना ओळख करून दिली. तेव्हा ते म्हणाले होते, की हा सुनील गावसकरानंतर देशातील दुसरा सर्वोत्तम फलंदाज आहे.

सुनील गावसकर, ,सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, राहुल द्रविड, संदीप पाटील, अनिल कुंबळे, युवराज सिंग, रमेश पवार यासोबतच श्रीलंकेचा सनथ जयसूर्या, रोशन महानामा यांना वासू परांजपे यांनी मार्गदर्शन केले आहे. गावसकरांना ‘सनी’ हे टोपणनाव त्यांनीच दिले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांचे ते वडील होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा