You are currently viewing आ.नितेश राणे यांच्या सूचनेनुसार फोंडा बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत 

आ.नितेश राणे यांच्या सूचनेनुसार फोंडा बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत 

फोंडाघाट

फोंडाघाट बाजारपेठेतील वाहतूक कोंडी ही गेले अनेक वर्षाची समस्या आहे. सध्या या बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत आ.नितेश राणे यांनी पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर फोंडाघाट बाजारपेठेतील वाहतुकीची समस्या पोलिसांच्या सहकार्याने सध्यातरी सुटली आहे.या बाबत व्यापारी अजित नाडकर्णी यांनी आ.नितेश राणे यांचे व पोलीसांचे आभार मानले आहेत.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा फोंडाघाट बाजारपेठ ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. गेले काही दिवस करूळ घाट व भुईबावडा घाट हे दोन्ही घाट मार्गात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्यामुळे बंद होते.त्यामुळे तळ कोकण आणि गोवा राज्यातील सर्व वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली होती.बाजारपेठेत दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे व्यापारी व लोकांना नेहमी त्रास सहन करावा लागत आहे.या बाबत फोंडाघाट येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी अजित नाडकर्णी यांनी या भागाचे आमदार नितेश राणे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी संपर्क साधला.फोंडाघाट बाजार पेठेतील नेहमीच्या वाहतूक कोंडी बाबत चर्चा केली.त्यानंतर सोमवारी सकाळ पासून पोलिसांनी बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चोक पोलिस बंदोबस्त ठेऊन सोमवारी बाजाराच्या दिवशी दिवसभर वाहतूक सुरळीत सुरू ठेवली होती. पोलिस आपले मित्र आहेत त्यांना जनतेने सहकार्य करणे गरजेचे आहे.या पुढेही पोलिस बंदोबस्त बाजारपेठेत असाच सुरू ठेवावा अशी मागणी अजित नाडकर्णी यानी पोलिसांकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा