राधानगरी अभयारण्य पर्यटन विकासाअंतर्गत ‘बस सफारी’ चे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते झाले. राधानगरी अभयारण्य हे जागतिक वारसा असलेले पर्यटन स्थळ असून तेथील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून पालक मंत्री यांनी पुढाकार घेऊन जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात तरतूद करून कोल्हापूर वन्यजीव विभागास १५+२ सीटर बस विकत घेतली.ही बस दररोज कोल्हापूर ते राधानगरी दाजीपूर पर्यटन अशी सफर करणार आहे. एका पर्यटकास नाममात्र 300 रुपये फी मध्ये दिवसभर जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे.
राधानगरी अभयारण्यात हत्तीमहाल, बटरफ्लाय पार्क, रौतवादी धबधबा, माळवाडी बोटिंग व दाजीपूर गवा सफारी या सर्व ठिकाणांना भेट देत येणार आहे.
आठवड्यातून एक दिवस या बसमधून शासनातर्फे अनाथ, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी याना सुद्धा मोफत जंगल सफारी करता येणार आहे.
या वेळी वन्यप्राणी यांनी सजविलेल्या अद्भुत बसचे उदघाटन माननीय पालकमंत्री श्री सतेज पाटील साहेब यांचे हस्ते फॉरेस्ट रेस्ट हौस येथे करण्यात येईल.