You are currently viewing मायोफा ऍग्रोटेक व्हेंचर्सच्या मधुमक्षिकापालन प्रशिक्षनाला उत्स्फूर्त प्रतिसाद….

मायोफा ऍग्रोटेक व्हेंचर्सच्या मधुमक्षिकापालन प्रशिक्षनाला उत्स्फूर्त प्रतिसाद….

सिंधुदुर्गनगरी

मायोफा ऍग्रोटेक व्हेंचर्स प्रा. लि.च्या वतीने आयोजित शेतकऱ्यांसाठी मोफत मधुमक्षिकापालन प्रशिक्षनाला उत्कृस्ट प्रतिसाद लाभला. या व्यवसायात मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करून आर्थिक उन्नति साधावी. असे आवाहन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष पाटील यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात केले.

मायोफा ऍग्रोटेक व्हेंचर्स प्रा. लि. च्यावतीने २६ ऑगस्ट रोजी (गुरुवारी,) सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी, कुळाचीवाडी, वाघेरी येथे ऑनलाईन मोफत मधुमक्षिकापालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणाकरिता शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बाजारपेठेत शुद्ध मधाला खूप मागणी आहे; परंतु बाजारात शुद्ध, भेसळमुक्त मधाची आवक कमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मधमाशीपालनाला खूप वाव आहे. त्याला चालना मिळणे गरजेचे आहे. यातूनच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाकरिता डॉ. मनोज गडाळे (सल्लागार, मायोफा ऍग्रोटेक प्रा.लि.) आणि डॉ. गुलझार शेख हे प्रमुख मार्गदर्शक लाभले होते. प्रशिक्षणामध्ये मधुमक्षिकापालनाची ओळख, आर्थिक व्यवस्थापन आणि घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाच्या सुरुवातीला आशिष पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, मायोफा) आणि सौरभ मोहिते यांनी मायोफा ऍग्रोटेक व्हेंचर्स प्रा. लि. कंपनीच्या शेतीभिमुख उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव मांडले तसेच प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.

कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता विश्वजित रावराणे, सत्यजित रावराणे, अभिजित रावराणे, प्रशांत रावराणे तसेच ग्रामपंचायत लोरे नं १, लोरे नं २, वाघेरी, भारत विद्यामंदिर लोरे शाळा नं १ व माध्यमिक विद्यालय लोरे नं २ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मायोफाच्या वतीने शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, तांत्रिक मदत दिली जाईल. असे यावेळी जाहीर करण्यात आले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधुमक्षिपालन व्यवसायाकडे वळावे. असे आवाहन मायोफा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकरी आशिष पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =