You are currently viewing कोकणी जनतेने उद्योजक व्हावे; केंद्रीय उद्योमंत्री नारायण राणे यांचे जनतेला आव्हान

कोकणी जनतेने उद्योजक व्हावे; केंद्रीय उद्योमंत्री नारायण राणे यांचे जनतेला आव्हान

कणकवली :

देशातील जनतेचे दर डोई उत्पन्न वाढविणारे माझे खाते आहे.उद्योग व्यवसाय वाढविणारे आणि उद्योजक घडविणारे माझे खाते आहे. कोकणातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, जनतेने तरुण – तरुणींनी उद्योजक व्हावे आणि माझ्या खात्याला,देशाच्या प्रगतीला हातभार लावा.मी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आपल्याला सर्वतोपरी सहकार्य माझ्या खात्यातून मिळेल.देशाचे आणि कोकणचे आर्थिक परिवर्तन करण्याठी सर्वतोपरी माझे प्रयत्न आणि सहकार्य राहील असे आश्वासन
केंद्रीय लघु, सूक्षम व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिले. ते कणकवलीत प्रहार भवन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, जनआशीर्वाद यात्रा ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेनुसार राज्यात जनआशीर्वाद यात्रा सुरू केली. मागील १० दिवस मुंबईसह पूर्ण कोकणात जनतेचे आशीर्वाद घेत आहे. रात्री १ वाजेपर्यंत जनता जन आशीर्वाद यात्रेसाठी थांबलेले दिसून आले.रेकॉर्ड ब्रेक असा प्रतिसाद जनतेने मला दिला . उद्योजक बनवून दरडोई उत्पन वाढविणारे, देशाचा जीडीपी वाढवणारे माझ्याकडे केंद्रीय लघु, सूक्षम व मध्यम उद्योग मंत्रीपदाचे खाते आहे.मला साथ देण्यासाठी सिंधुदुर्गवासियानो उद्योजक व्हा असे आवाहन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी विधनापरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जि. प. अध्यक्षा संजना सावंत ,राजन तेली उपस्थित होते. जनआशीर्वाद यात्रेत अपशकुन करत काही ठिकाणी मांजर आडवे गेले.मात्र अशा मांजरीना मी भीक घालत नाही.

आधी स्वतःच्या मुलांचे गुण बघा. संजय राऊत मुळे शिवसेना खड्ड्यात जात आहे. सामना आणि संजय राऊत ची प्रतिमा बौद्धिक लोकांमध्ये मलिन झाली आहे. माझ्या मुलांची बरोबरी करू नको. माझे दोन्ही मुलगे उच्चशिक्षित आहेत. माझ्यावर प्रेम करणारे माझे मुलगे असून माझ्या प्रतिमा जपण्याची काळजी ते घेत आहेत. राऊत तुमची लेखणी थांबवा अन्यथा आम्हीही आमचा प्रहार करू असा निर्वाणीचा इशारा केंद्रीयमंत्री राणे यांनी दिला.

मंत्री अनिल परब यांचा बुरखा शेवटी माध्यमानीच फाडला. पोलिसांना माझ्या अटकेचे आदेश जणू राष्ट्रपतीच्या आवेशात देत होता. माझ्यावर वाईट बोलल्याशिवाय सेनेत पद मिळत नाही. म्हणून माझ्यावर सेनेवाले टीका करतात. याचे उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गातील खासदार आहेत.त्यांचे नाव घेऊन माझा दिवस खराब करणार नाही. अशी नामोल्लेख न करता विनायक राऊत यांच्यावर टीका केली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा