You are currently viewing केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी वैभववाडी सज्ज

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी वैभववाडी सज्ज

वैभववाडी
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा आज काही वेळातच वैभववाडीत दाखल होत आहे. लाडक्या नेत्यांच्या स्वागतासाठी वैभववाडीवासिय सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरू असलेले ढोलपथक वाद्य सर्वांचे आकर्षण ठरत आहे. सजविण्यात आलेल्या संभाजी चौकात कार्यकर्ते गर्दी करु लागले आहेत.

जल्लोषात होणाऱ्या यात्रेची चर्चा गावागावात, वाडीवस्तीत सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. यात्रेची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आज खारेपाटण. तरेळे येथून ही यात्रा वैभववाडीत दाखल होणार आहे.

नारायण राणे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग मध्ये प्रथमच आलेली महिंद्रा ची थार कार 200 स्कुटर रॅली या ताफ्यात दाखल होणार आहे. ही रॅली तरळे ते वैभववाडी अशी असणार आहे.  या रॅली चे नियोजन युवामोर्चा तालुका वैभववाडी भाजपाने केले असल्याची माहिती युवा चे जिल्हा चिटणीस नगरसेवक संताजी रावराणे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा