You are currently viewing नारायण राणेंना जामीन; वेंगुर्लेत जल्लोष

नारायण राणेंना जामीन; वेंगुर्लेत जल्लोष

भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंद

वेंगुर्ले

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांना महाड कोर्टाने जामीन मंजूर झाल्यावर आज सकाळी वेंगुर्ले भाजपा च्या वतीने तालुका कार्यालयाच्या बाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळी राणे साहेबांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, आघाडी सरकारचा निषेध असो, ठाकरे सरकार हाय हाय, राणे साहेब आगे बढो – हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय अशा घोषणा देत आसमंत दुमदुमला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ, महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक – वसंत तांडेल – बाळा सावंत, युवा मोर्चा ता.अध्यक्ष प्रसाद पाटकर, ता.उपाध्यक्ष दिपक नाईक – संतोष गावडे – लक्ष्मीकांत कर्पे, नगरसेविका शितल आंगचेकर व ईशा मोंडकर , ता.चिटनीस समीर चिंदरकर, किसान मोर्चा चे बाळु प्रभु , शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे – जगंन्नाथ राणे – कमलेश गावडे, तुळस सरपंच शंकर घारे, परबवाडा सरपंच पपु परब, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे, विभागीय अध्यक्ष अमित गावडे, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, युवा मोर्चा चे संदीप पाटील – प्रणव वायंगणकर – भुषण सारंग – संदीप तांडेल, तेजस मोबारकर – पुंडलिक हळदणकर – विशाल जाधव – निलय नाईक – राहुल मोर्डेकर – प्रदिप मठकर – सागर राणे – साईप्रसाद भोई, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, किशोर परब, माजी उपनगराध्यक्ष दाजी परब, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, ओंकार चव्हाण, दिवाकर कुर्लै , गजानन कुबल इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा