You are currently viewing नारायण राणे यांना जामीन मंजूर; महाड कोर्टाचा निर्णय

नारायण राणे यांना जामीन मंजूर; महाड कोर्टाचा निर्णय

नाशिक, पुणे पोलीस राणेंचा ताबा घेणार नाहीत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. दरम्यान, कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राणेंना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी कोर्ट परिसरात जल्लोष केला.

सरकारी वकील म्हणाले…युक्तीवादादरम्यान, सरकारी वकील म्हणाले, नारायण राणे हे जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य कसं काय होऊ शकतं? यामागे कोणतं कट-कारस्थान होतं का? मुख्यमंत्रिपदाच्या प्रतिष्ठेवर नारायण राणेंकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारी वकिलांनी कोर्टाकडे ७ दिवसांची कोठडी मागितली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा