You are currently viewing सिंधुदुर्गात राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत भाजपचे दिग्गज नेते होणार सहभागी!

सिंधुदुर्गात राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत भाजपचे दिग्गज नेते होणार सहभागी!

वैभववाडी

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा बुधवार दि. २५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात दाखल होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेची जय्यत तयारी जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असून राज्यस्तरावरील प्रमुख नेतेमंडळी या यात्रेत सहभागी होणार असल्याने या यात्रेची उत्सुकता अधिक वाढली आहे. वैभववाडी मध्ये या जन आशीर्वाद यात्रेत भाजपा नेते तथा माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे सहभागी होणार आहेत.

जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या खारेपाटण येथे तसेच तरेळे येथे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे जल्लोषात स्वागत होणार आहे. वैभववाडी भाजपच्या वतीने येथील संभाजी चौकात न भूतो न भविष्यती असे देखणे स्वागत होणार आहे. तालुकाध्यक्ष नासीर काझी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी एकजुटीने स्वागताच्या नियोजनात व्यस्त आहेत. नारायण राणे यांच्या समवेत संपूर्ण यात्रेत राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे सहभागी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा