You are currently viewing अखेर वैभववाडी तहसील कार्यालयात आधार कार्ड सेवा केंद्र सुरू…

अखेर वैभववाडी तहसील कार्यालयात आधार कार्ड सेवा केंद्र सुरू…

तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते उदघाटन

वैभववाडी

बऱ्याच वर्षापासून रखडलेला प्रश्न सुटला आहे. वैभववाडी तालुक्यामध्ये आधार कार्ड सेवा केंद्र चालु करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते पार पडले. येथील तहसील कार्यालयात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे वैभववाडी वासियांना मोठा आधार मिळाला आहे.

विविध शासकीय कामांसाठी आधारकार्ड गरजेचे बनले आहे. आधार कार्ड सेवा वैभववाडी तालुक्यामध्ये नसल्याने नागरिक संभ्रमावस्थेत होते. या केंद्रावर नवीन आधार कार्ड काढणे, चुकीची दुरुस्ती करणे, आदी कामे केली जाणार आहेत. उद्घाटन प्रसंगी नायब तहसीलदार अशोक नाईक, मंडळ अधिकारी दीपक पावसकर, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर दळवी, सेतू सुविधा केंद्राचे समन्वयक शैलेश सुर्वे, प्रसाद सर, नमिता दळवी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा