You are currently viewing ज्येष्ठ पत्रकार कै. अरविंद शिरसाट यांचा प्रथम स्मृतिदिन कळसुलकर इंग्लिश स्कूल विद्यालयात साजरा

ज्येष्ठ पत्रकार कै. अरविंद शिरसाट यांचा प्रथम स्मृतिदिन कळसुलकर इंग्लिश स्कूल विद्यालयात साजरा

सावंतवाडी

ज्येष्ठ पत्रकार तसेच सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडीचे संचालक कै. अरविंद शिरसाट यांचा प्रथम स्मृतिदिन कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, संस्था सचिव डॉक्टर श्री प्रसाद नार्वेकर, सदस्य श्री मुकुंद वझे, श्रीम. राजश्री टिपणीस, श्री शांबा म्हापसेकर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व छायाचित्रकार श्री अरूण भिसे ऊपस्थित होते. स्वर्गीय शिरसाट यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला व आदरांजली वाहण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा