You are currently viewing झाडाला राखी बांधून बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

झाडाला राखी बांधून बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बांदा

गेले दिड वर्षाहून अधिक काळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरीही बांदा केंद्रशाळेच्या वतीने आॉनलाईन स्वरूपात सहशालेय उपक्रमांची प्रभावीपणे अमंलबजावणी केली जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव जागती व्हावी यासाठी स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत झाडांना राखी बांधून वृक्षसंर्वधनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारा रक्षाबंधन सण शाळेत दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो . लाॅकडाऊनमुळे शाळा बंद असल्या तरीही बांदा केंद्रशाळेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी यासाठी विविध नैसर्गिक पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून राख्या बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला होता.विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानानाही पोस्टाने राख्या पाठवल्या होत्या. तसेच रक्षाबंधन सणादिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परीसरातील झाडाला राखी बांधावी व त्याचे औक्षण करावे व त्याचे आॅनलाईन फोटो पाठवावेत असे आवाहन केले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक व पालक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले शाळेने राबविलेल्या या आॉनलाईन उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा