सिंधुदुर्गनगरी
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे गुरुवार दि. 26 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
गुरुवार दि. 26 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने ओरोस – सिंधुदुर्ग कडे प्रयाण, सकाळी 11.00 वा, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अरुणा प्रकल्पग्रस्त संदर्भात आढावा बैठक, दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे नरडवे व देवघर प्रकल्प आढावा बैठक, दुपारी 3.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीच्या नियोजनाबाबत संबंधित यंत्रणेसमवेत आढावा बैठक व कार्यपूर्ती अहवालाबाबत चर्चा, दुपारी 4.30 वा. ओरोस- सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने दोडामार्गकडे प्रयाण, सायं. 6.00 वा. तहसिल कार्यालय, दोडामार्ग येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कार्यकारी अभियंता, तिलारी प्रकल्प, जिल्हा भूसंपादन अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, दोडामार्ग तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उपवनसंरक्षक, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, प्रकल्पग्रस्त व संबंधित अधिकारी यांच्या समवेत कळणे खनिज प्रकल्प व तिलारी – पाल पुनर्वसनमधील नागरी सुविधा व तिलारी प्रकल्पाबाबत आढावा बैठक, सायं. 6.30 वा. दोडामार्ग येथे शिवसेना तालुका दोडामार्ग पदाधिकारी बैठक, सायं. 7.00 वा. दोडामार्ग येथून मोटारीने पुण्याकडे प्रयाण.