You are currently viewing ओरोस स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे कोविड सेंटरची निर्मिती करण्याची आमदार वैभव नाईक यांची मागणी.

ओरोस स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे कोविड सेंटरची निर्मिती करण्याची आमदार वैभव नाईक यांची मागणी.

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोविड च्या पहिल्या स्टेजमध्ये असलेल्या रुग्णांसाठी ओरोस मधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आणखी एका 100 बेड च्या सेंटरची निर्मिती करावी. अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड रुग्ण संख्या वाढत आहे. सध्या ओरोस येथील जिल्हा कोविड रुग्णालयात 350 पेक्षा जास्त रुग्णांना उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्ण जिल्ह्यातील इतर कोवीड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहेत.
कोविड वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मुंबई बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या धरतीवर ओरोस येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये 100 बेडच्या स्वतंत्र कोविड सेंटर ची उभारणी करण्यात यावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 6 =