You are currently viewing भाजप सरकार हे कोकणवर अन्याय करणारे सरकार – आ. वैभव नाईक

भाजप सरकार हे कोकणवर अन्याय करणारे सरकार – आ. वैभव नाईक

*भाजप सरकार हे कोकणवर अन्याय करणारे सरकार – आ. वैभव नाईक*

*वायंगणी आणि तोंडवळी गावात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांची भूमिपूजने*

वायंगणी आणि तोंडवळी गावाची सत्ता ग्रामस्थांनी शिवसेनेकडे दिल्यानंतर येथील विविध विकास कामे मार्गी लावण्यात यश आले.वायंगणी गावामध्ये विविध योजने मधून विकास कामांसाठी ५५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तोंडवळी मध्ये इतर विकास कामांबरोबरच धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात येत आहे. वायंगणी मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडकच्या रस्त्याच्या कामाचे पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केले त्याला दोन महिने झाले तरी कामाची वर्कऑर्डर होत नाही. शिंदे आणि भाजपने केवळ मंजूर विकास कामे थांबविण्याचे काम केले आहे.मात्र कोर्टाने स्थगिती उठविण्याचे आदेश दिल्याने कामे पुन्हा सुरु झाली.त्यामुळे भाजप सरकार कोकणवर अन्याय करणारे सरकार आहे अशी टीका आ. वैभव नाईक यांनी केली आहे.

वायंगणी आणि तोंडवळी गावामध्ये विविध विकास कामांची भूमिपूजने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत सत्कार केला.
यामध्ये वायंगणी नळेकरवाडी येथे श्री. स्वामी समर्थ मठाच्या बाजूला सभामंडप बांधणे १० लाख, वायंगणी भटवाडी ते पाटवाडी येथे स्ट्रिटलाईट बसवीणे ५ लाख, वायंगणी घाडीवाडी ते ज्ञानदिप हायस्कूल रस्ता खडिकरण व
डांबरीकरण करणे २६ लाख, घाडीवाडी ते स्मशानभूमी स्ट्रिटलाईट बसविणे ५ लाख, वायंगणी तळेवाडी येथे जलजिवन मिशन योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेची टाकी बांधणे, हिर्ले वायंगणी ग्रा. मा. क्र. ४१ डांबरीकरण करणे ५ लाख, वायंगणी गावराखा येथे गणेश घाट बांधणे निधी ४ लाख
त्याचबरोबर तोंडवळी वरची वाघेश्वर मंदिर ते गांगोमंदिर करंजेवाडी येथे संरक्षक भिंत बांधून रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे निधी ६ लाख ५७ हजार रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांची भूमिपूजने करण्यात आली.

याप्रसंगी तोंडवळी येथे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,विभाग प्रमुख समीर लब्दे,आचरा समन्वयक मंगेश टेमकर, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, संजय केळुसकर, युवासेना शाखा प्रमुख राजा पेडणेकर, ग्रा. प. सदस्य ज्ञानेश गोलतकर, अनन्या पाटील,मानसी चव्हाण,दशरथ वायंगणकरनिनाद गोलतकर, अक्षय पुजारे, विष्णू गोलतकर, संतोष आचरेकर, अनिल पाटील, राजेंद्र तोंडवळकर, हेमंत पाटील, श्रीकृष्ण पुजारे, अरुण पाटील, सुनील चेंदवणकर, सुभाष पाटील, मनोहर पाटील, महेश चव्हाण, देविका पाटील, निधी पाटील, मानसी चव्हाण, रोहन पेडणेकर,ओमकार पाटील, शंकर पेडणेकर, किशोर पेडणेकर,तारका पेडणेकर, प्रमोद पाटील . प्रकाश चव्हाण, सदानंद गोलतकर,शेखर मुळे आदी ग्रामस्थ

वायंगणी येथे उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे, उपविभाग प्रमुख सचिन रेडकर,सरपंच रुपेश पाटकर, उपसरपंच समृध्दी आसवलकर, शाखाप्रमुख दिनेश साळकर, साई साळकर, ग्रा. पं. सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, आनंद मुरवणे, स्वप्नील सुर्वे, सागर राणे, रुपेश राणे, गुरुनाथ वायंगणकर, अनिल महाजन, बाळकृष्ण सावंत, दिलीप कांबळी, पंडित खोत, संतोष सावंत, सुंदर भगत, सविता राणे, साई साळकर, प्राची साळकर, लतिका वायंगणकर, वनिता राणे, सूर्यकांत सावंत, सीमा सावंत, उदयचंद्र नाईक, शांताराम आजगावकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 15 =