You are currently viewing बंधन प्रेमाचे

बंधन प्रेमाचे

वाट पाही भाऊराया
आज बहीण येणार
धागा प्रेम विश्वासाचा
मनगटी बांधणार

रोज येते आठवण
कडा ओलावती डोळे
भाव मनातले तिच्या
गाली आनंदाश्रू बोले

नातं अतूट प्रेमाचे
भावा बहिणीचे असे
राग द्वेष मनामध्ये
चुकूनही येत नसे

माया ममतेची मूर्ती
प्रेम हृदयी अपार
जीवनास बहिणीच्या
भाऊ देतसे आकार

ओढ माहेराची तिला
भाऊ स्वागतास उभा
भासे हृदय भावाचे
जसा मंदिराचा गाभा

सण राखी पौर्णिमेचा
रेशमांच्या बंधनांचा
भाऊ बहीण नात्याचा
सोहळाच भावनांचा.

{दिपी}
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =