You are currently viewing जमलंच कधी तर…!

जमलंच कधी तर…!

जमलंच कधी तर…!

जमलंच कधी तर..
स्वतःशी एकदा बोलून बघा.
स्वतःच्या मनात काय चाललंय..
तेही तुम्ही स्वतःच,
आपल्याच मनाला विचारून बघा.

जमलंच कधी तर..
थोडं भावनिक होऊन बघा.
स्वतःची सर्व दुःख..
मात्र एकाच घोटात,
बुडासहित पिऊन बघा.

जमलंच कधी तर.
दुःखही सुखा सारखेच,
हसत हसत जगून बघा.
दुःखावर मात करून,
सुखाची अनुभूती घेऊन बघा.

जमलंच कधी तर..
गोरगरिबांच्या झोपडीत,
फेरफटका मारून बघा.
दिनदुबळे जीवन त्यांचे,
सोबत त्यांच्या राहून बघा.

जमलंच कधी तर..
स्वतःची दिशा बदलून बघा.
जनाच्या मागे धावण्यापेक्षा..
मनाच्या मागे हळूच,
एकदा तरी पळून बघा.

जमलंच कधी तर..
स्वप्नांवर जगणाऱ्या त्या,
नजरेस नजर भिडवून बघा.
डबडबलेल्या डोळ्यांत त्यांच्या,
फक्त एकदा उतरून बघा.

जमलंच कधी तर..
“मित्रा” म्हणून हक्काने,
एकच हाक मारून बघा.
मैत्रीचा हात पुढे करून..
फक्त एकदाच..
मनात शिरून बघा…

खरंच….
जमलंच कधी तर….!!

(दीपी)
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 5 =