You are currently viewing उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

२३ ऑगस्टला अंत्यसंस्कार

 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे आज(शनिवार) वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. लखनऊ मधील एसजीपीजीआयमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. दोन वेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील होते. जेव्हापासून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून अनेकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या निधनावर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. राम मंदिर आंदोलनातील ते भाजपाचे एक प्रमुख नेते होते. तर, उत्तर प्रदेशमध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला जाणार असून, २३ ऑगस्ट रोजी कल्याण सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा