You are currently viewing विविध विकास कामासंदर्भात वेधले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे लक्ष

विविध विकास कामासंदर्भात वेधले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे लक्ष

 

विविध विकास कामासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष दिपक जाधव यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना निवेदन दिले.
दोडामार्ग येथे समाजासाठी भव्य स्वरुपाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावे.

छ. संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभुमीत बांदा कट्टा सर्कल येथे ५० फुटी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा,सामाजिक न्याय विभागात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची विनाविलंब पूर्तता व्हावी, घरकुल योजना, घर दुरुस्ती योजना, पेन्शन योजना
तसेच शासकीय कमिट्यांमध्ये सामाजिक न्याय विभागातील कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेण्यात यावे.

या प्रमुख मागण्या केल्या असून त्या मागण्यांची आपल्या स्तरावर अंमलबजावणी व्हावी, अशी विनंती केली आहे. आपण यात लक्ष घालून आमच्या विविध मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर याची पूर्तता करावी, असे देखील दोडामार्ग दिपक जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा