You are currently viewing वैभववाडी तालुका भाजपा महिला प्रभारी अध्यक्षपदी प्राची तावडे यांची निवड

वैभववाडी तालुका भाजपा महिला प्रभारी अध्यक्षपदी प्राची तावडे यांची निवड

वैभववाडी

वैभववाडी भाजपा महिला प्रभारी अध्यक्षपदी प्राची तावडे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती दिलीप रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, युवक तालुकाध्यक्ष किशोर दळवी, पं.स. सदस्य हर्षदा हरयाण, माजी सभापती शुभांगी पवार, सुनील भोगले, महिला जिल्हा सरचिटणीस रेखा कानेकर, बंड्या मांजरेकर, रितेश सुतार, रत्नाकर कदम, संताजी रावराणे, प्रदीप नारकर, प्रदीप जैतापकर, समिता कुडाळकर, अक्षता जैतापकर, सौ. बावधाने, सुप्रिया तांबे, नवलराज काळे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राची तावडे यांनी यापूर्वी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली होती. संघटना वाढीसाठी त्यांचे योगदान चांगले राहिले आहे. सद्यस्थितीत भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. पक्षाने त्यांना तालुका अध्यक्षपदी संधी दिली आहे. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा