You are currently viewing कणकवली तालुका शिवसेनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

कणकवली तालुका शिवसेनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

उपतालुकाप्रमुखपदी हेमंत सावंत तर उपविभागप्रमुखपदी नितीन हरमलकर

कणकवली

शिवसेना कणकवली तालुक्याच्यावतीने नविन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये उपतालुका प्रमुखपदी भिरवंडे गावचे सुपूत्र हेमंत सावंत तर उपविभाग प्रमुखपदी शिवडाव गावचे सुपूत्र नितीन हरमलकर यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या कणकवली येथे झालेल्या बैठकीत खा. विनायक राऊत यांच्या हस्ते हेमंत सावंत व नितीन हरमलकर यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेकडून संघटनात्मक पदांची निवड करण्यात आली असून त्यांच्याकडे विभागनीहाय जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उपतालुकाप्रमुखपदी निवड झालेल्या हेमंत सावंत यांच्याकडे हरकुळ बुद्रुक व नाटळ जि. प. मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपविभाग प्रमुख पदी निवड झालेल्या नितीन हरमलकर यांच्याकडे नरडवे पं.स. मतदार संघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

शिवसेनेच्या कणकवलीतील झालेल्या बैठकीत या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जि.प. सदस्य संजय आग्रे, सौ. मधुरा पालव, सचिन सावंत, राजू शेटये, दिगंबर पाटील, डॉ. प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, ललित घाडीगावकर, आनंद आचरेकर आदी उपस्थित होते.

शिवसेना पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत करताना सर्वांना सोबत घेऊन पुढे जात तळागाळापर्यंत पक्षाची ताकद अधिक भक्कम केली जाणार आहे. असे उपतालुका प्रमुख हेमंत सावंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा