You are currently viewing नवउद्योजकांनी ऑनलाईन टुरिस्ट गाईड प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

नवउद्योजकांनी ऑनलाईन टुरिस्ट गाईड प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

बाबा मोंडकर – अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसाईक महासंघ

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून येणाऱ्या काळात जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत पर्यटन संचालनालयामार्फत टुरिस्ट गाईड होण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत आहे.  टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील ७०० हून अधिक युवक-युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजुनही उपलब्ध असून पात्र इच्छूकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ मार्फत करण्यात येत आहे. यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित, परवानाधारक मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याही पर्यटनस्थळांवर (पुरातत्व विभागाची सर्व पर्यटनस्थळे वगळता) मार्गदर्शक सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http:itf.gov.in पोर्टलवर भेट द्यावी किंवा योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्याशी diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने तयार केलेला मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम पर्यटन संचालनालयाने स्वीकारला आहे.

http://www.iitf.gov.in पोर्टलवर मूळ ऑनलाइन कोर्स हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विविध पर्यटन पैलूंचे सात मॉड्यूल आहेत. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क २ हजार रुपये आहे. एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवार यांना परीक्षा शुल्क ५०० रुपये इतके आहे. उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि १८ ते ४० वयोगटातील असावा. उमेदवार ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल तर त्याने किमान दहावी उत्तीर्ण असावे, अशा काही अटी या प्रशिक्षणासाठी आहेत तरि यां संधीचा लाभ घ्यावा अशी माहिती श्री बाबा मोंडकर अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसाईक महासंघ यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा