You are currently viewing जि. प. सदस्या सौ मनस्वी घारे यांस कडून इळये प्रा. आ. केंद्राला वॉटर प्युरिफायर भेट

जि. प. सदस्या सौ मनस्वी घारे यांस कडून इळये प्रा. आ. केंद्राला वॉटर प्युरिफायर भेट

देवगड
इळये प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ मनस्वी घारे यांनी 15 ऑगस्ट चे औचित्य साधून वॉटर प्युरिफायर भेट म्हणून दिला आहे. किंजवडे मतदार संघातील जिल्हा परिषदेतील सदस्य मनस्वी घारे यांनी कोरोनाविषाणू च्या काळात अनेक गरजू लोकांना जीवनावश्यक गोष्टी दिल्या आहेत. तसेच चिपळूण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान ग्रस्त जनतेला जीवनावश्यक वस्तू पुरविल्या आहेत.

नेहमी समाजाचे भान ठेवून त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले असून यापुढेही त्या अशाच कार्यरत राहणार आहेत. करोना विषाणू मुळे रोजंदारी गेलेल्या अनेक गरीब कुटुंबांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. गोरगरीब जनतेला आधार देणे हे आपले प्रथम कर्तव्य असून आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून मनस्वी घारे या हे समाजकार्य करीत आहेत

रुग्णांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उदात्त भावनेने त्यांनी इळये प्राथमिक आरोग्य केंद्राला वॉटर प्युरिफायर भेट दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा