You are currently viewing कुडाळ तालुक्यातील दोन तरुणांचा सावंतवाडी मोती तलावालगत झाड अंगावर पडून जागीच मृत्यू

कुडाळ तालुक्यातील दोन तरुणांचा सावंतवाडी मोती तलावालगत झाड अंगावर पडून जागीच मृत्यू

सावंतवाडी :

 

सावंतवाडी शहरातील मोती तलावालगत राजवाड्यासमोर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे झाड कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. संभाजी दत्ताराम पांढरे व
राहुल प्रकाश पांढरे (दोघेही राहणार आंजीवडे, ता. कुडाळ) अशी त्यांची नावे आहेत. अपघातानंतर त्यांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र झाड मोठे असल्यामुळे त्यांना वाचविण्यात अपयश आले. भजन करून घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे तीव्र शोक व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा