कणकवली
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतले स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यांनतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देतांना स्व.बाळासाहेबांच्या आठवनींना उजाळा दिला. ते म्हणाले,आज मी जो काही आहे तो बाळासाहेबांमुळे आहे. बाळासाहेबांनीच मला घडवलं आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव. माझे आशीर्वाद आहेत. आणि डोक्यावर हात ठेवला असता. आज जरी हात नसला, तरी साहेबाबचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत. अशी माझी समज आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचं स्मारक असो, दैवताचं स्मारक असो, त्याला विरोधाची भाषा करू नये. भावनेचा विचार करावा आणि तसं वक्तव्य करावं. ही जनआशीर्वाद यात्रा यशस्वी होईल. येणारी महानगारपालिका भाजप जिंकणार आणि ३२ वर्षाचा पापाचा घडा फुटणार’, असे नारायण राणे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा दादर शिवाजी पार्क येथे दाखल झाली आहे. यावेळी नारायण राणे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्मारकावर लीन झालेत.पहिल्यांदाच नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला आज भेट दिली आहे.
बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुले त्यांच्या स्मृतीस्थळावर अर्पण करत राणेंनी बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरेंसोबत कितीही टोकाचं राजकीय विरोध असला तरीही स्व. बाळासाहेबांविषयी राणेंच्या मनात असलेला आदर जगजाहिर आहे. बाळासाहेबांच्या अंत्यविधीवेळी राणे परदेशात असल्याने बळासाहेबांचं दर्शन ते घेऊ शकले नव्हते. आज त्यांनी प्रथमच स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी स्वा. सावरकरांच्या स्मारकाचंही दर्शन घेतलं आहे.