You are currently viewing Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार ठरतेय भारतीयांच्या पसंतीची…

Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार ठरतेय भारतीयांच्या पसंतीची…

 

याकारची तुफान मागणी लक्षात घेता Nissan उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीकडून 1500 नव्या कर्मचाऱ्यांची भरती…

निसानच्या ‘या’ कारची तुफान मागणी, उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीकडून 1500 नव्या कर्मचाऱ्यांची भरती
शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक या गाडीला पाहायला आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे.
भारतात गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हींना चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्या भारतीयांची मागणी आणि पसंती लक्षात घेत गाड्या डिझाईन करुन भारतीय मार्केटमध्ये लाँच करत आहेत. निसान कंपनीने 3 डिसेंबर रोजी Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच केली होती. ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. या कारसाठी देशभरात खूप मोठी मागणी आहे.
या कारसाठी देशभरातून प्रचंड मागणी असून वेटिंग पिरियडही खूप मोठा आहे. त्यामुळे कंपनी डिलर्ससोबत भागिदारी करत निसान मॅग्नाईट या कारचं उत्पादन (Production) वाढवण्यासाठी तब्बल 1 हजार 500 नव्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणार आहे. याबाबतची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. कंपनीने यापूर्वीच मॅग्नाईटचे उत्पादन वाढवलं होतं. त्याद्वारे कंपनी फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक महिन्याला 2 हजार 500 युनिट्स बनवू शकेल, अशी योजना बनवली होती. परंतु त्यानंतरही मागणी वाढतच आहे. त्यामुळे आता कंपनीने मॅग्नाईटच्या प्रत्येक महिन्याला 3 हजार 500 ते 4 हचार युनिट्स बनवण्याचं ध्येय ठेवलं आहे. त्यासाठीच कंपनी नव्या कर्मचाऱ्यांची भरती करत आहे. जेणेकरुन अधिक वेगाने गाड्या तयार होतील आणि कमीत कमी वेटिंग पिरियडवर ग्राहकांपर्यंत कार पोहोचतील.
कंपनीने 2 डिसेंबर रोजी ही कार लाँच केली होती. आतापर्यंत या कारसाठी 32 हजार 800 बुकिंग्स आल्या आहेत. सध्या या कारसाठी 4 ते 6 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. तर या कारच्या टॉप व्हेरियंटसाठी तब्बल 8-9 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव याबाबत म्हणाले की, आमची इच्छा आहे की, ग्राहकांना लवकरात लवकर मॅग्नाईट मिळावी. त्यामुळे या कारचं उत्पादन वाढवण्याच्या दिशेने आम्ही काम सुरु केलं आहे. आम्ही आमच्या प्रोडक्शन प्लांटमध्ये तिसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली आहे. तसेच प्लांटमध्ये 1 हजार हून अधिक नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 4 लाख 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.

निसान मॅग्नाईटच्या सर्व (10) व्हेरियंट्सच्या किंमती

1. Magnite XE – 4.99 लाख रुपये
2. Magnite XL – 5.99 लाख रुपये
3. Magnite XV – 6.68 लाख रुपये
4. Magnite XV Premium – 7.55 लाख रुपये
5. Magnite Turbo XL – 6.99 लाख रुपये
6. Magnite Turbo XV – 7.68 लाख रुपये
7. Magnite Turbo XV Premium – 8.45 लाख रुपये
8. Magnite Turbo XL CVT – 7.89 लाख रुपये
9. Magnite Turbo XV CVT – 8.58 लाख रुपये
10. Magnite Turbo XV Premium CVT – 9.35 लाख रुपये

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =