You are currently viewing शाळा सुरू करण्यापूर्वी बांदा शाळेतील पालकांकडून स्वच्छता अभियान राबवून पूर्वतयारी

शाळा सुरू करण्यापूर्वी बांदा शाळेतील पालकांकडून स्वच्छता अभियान राबवून पूर्वतयारी

बांदा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली अनेक दिवस बंद असलेल्या शाळा ४आॅक्टोबर पासून शासकीय आदेशान्वये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत सुरु होत आहेत. शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर शाळांमधून साफसफाई करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या बांदा केंद्रशाळेतही नेहमी पालकांच्या सहकार्याने शाळा व परिसर साफसफाई करण्यात येत असते.लाॅकडाऊन कालावधीत या शाळेमध्ये चार लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव करून शाळा रंगरंगोटी व विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन आकर्षक शाळा बनवण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार ४ आॉक्टोबर पासून पाचवी इयत्तेपासून शाळा सुरू करावयाच्या पार्श्वभूमीवर पालक, शिक्षक व ग्रामपंचायत बांदा यांच्या श्रमदानातून शाळा परिसर स्वच्छ करुन आकर्षक बनविण्यात आला आहे. बांदा केंद्रशाळेला मिळत असलेल्या लोक सहभागाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर,सरपंच अक्रम खान व मुख्याध्यापक सरोज नाईक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − seven =