You are currently viewing ग्रामपंचायत माड्याचीवाडी येथे दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव व कोरोना योद्ध्यांचा सत्कार

ग्रामपंचायत माड्याचीवाडी येथे दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव व कोरोना योद्ध्यांचा सत्कार

कुडाळ येथील माड्याचीवाडी ग्रामपंचायतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोरोना योद्धयांचा आणि इयता दहावी च्या परीक्षेत यशस्वी विध्यार्थ्यांचा विशेष गौरव केला आहे. आशा स्वयंसेवीका ,अंगणवाडी सेविका, बचत गट crp यांनी कोरोना कालावधीत चांगली कामगिरी केली आपल्या गावासाठी स्वतः ची पर्वा न करता आपल्या गावासाठी एक योद्धा म्हणून कामगिरी केली त्यामुळे विशेषतः ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच यावर्षी इयत्ता दहावी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून आलेल्या पहिल्या 1 ते 3 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आलं. यावेळी प्रथम आलेली सेजल नंदकिशोर गावडे, द्वितीय खुशी रामचंद्र गावडे, आणि साक्षी संतोष परब यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला माड्याचीवाडी सरपंच सचिन गावडे, उपसरपंच योगेश्वरी कोरगावकर, जी प सदस्या वर्षा कुडाळकर, विघ्नेश गावडे, श्री सुदर्शन धोंगडे, काशीबाई कोरगावकर, अस्मिता गावडे, कांचन डिचोलकर, अनंत गावडे, संभाजी गावडे, मंगेश गावडे सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा