You are currently viewing पथनाट्यातून फटाकेमुक्त दिवाळीसाठी केले प्रबोधन

पथनाट्यातून फटाकेमुक्त दिवाळीसाठी केले प्रबोधन

*पथनाट्यातून फटाकेमुक्त दिवाळीसाठी केले प्रबोधन*

पिंपरी

‘फ… फ… फटाक्याचा अन् प्र… प्र… प्रदूषणाचा!’ या पथनाट्याच्या प्रभावी सादरीकरणातून राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे गुरव येथे रविवार, दिनांक ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०८:०० वाजता दिलासा संस्था, कलारंजन प्रतिष्ठान, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या तीन संस्थांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी नागरिकांचे प्रबोधन केले. याप्रसंगी वृक्षमित्र अरुण पवार, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर, तानाजी एकोंडे, कलारंजनचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, दिलासाचे अध्यक्ष सुरेश कंक आणि मानवी हक्क संरक्षणचे अध्यक्ष अण्णा जोगदंड यांच्यासह साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

‘फ… फ… फटाक्याचा अन् प्र… प्र… प्रदूषणाचा!’ या पथनाट्यात संजना करंजावणे, अण्णा जोगदंड, शामराव सरकाळे, सुभाष चव्हाण, मुरलीधर दळवी, नंदकुमार कांबळे, श्रावणी अडागळे, सारंगी करंजावणे, सुरेश कंक यांनी सहभाग घेऊन फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी नाट्यपूर्ण प्रसंगांचे सादरीकरण करून उद्बोधक माहिती दिली. फटाक्यांमध्ये असलेल्या कॅडमियम, पोटॅशियम, सल्फर यासारख्या विषारी रसायनांच्या ज्वलनामुळे अनेक घातक वायूंचे उत्सर्जन होते. त्यामुळे गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सर्वांना श्वसनविकार, कर्णबधिरत्व, हृदयविकार अशा अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक विकारांचा प्रादुर्भाव होतो; याशिवाय अपघातांचा धोका बळावतो, याविषयी प्रबोधन करण्यात आले.

यावेळी श्रीकांत चौगुले यांनी, “दिवाळी हा आनंदाचा सर्वात मोठा सण असल्याने पारंपरिक प्रतीकांच्या माध्यमातून तो साजरा केला जात असताना फटाक्यांना त्यात स्थान नसावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. अरुण पवार यांनी, “समाज परिवर्तन हे एका दिवसात घडत नाही. त्यामुळे पथनाट्यासारखे प्रबोधनाचे माध्यम परिणामकारक ठरते!” असे मत व्यक्त केले. यावेळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची सामुदायिक शपथ घेण्यात आली त्यामध्ये आत्माराम हारे, रेखा सातोकर, तुळशीराम जगदाळे, उमा मोटेगावकर, गणेश वाडेकर, विजया नागटिळक, संजय गमे, जयश्री गुमास्ते, वामन भरगंडे, बाळासाहेब साळुंके, दिनेश घोगरे, योगिता कोठेकर, नीलेश हंचाटे, सागर जाधव, सूर्यकांत तिकोणे, अंकुश जाधव यांनी सहभाग घेतला. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा